Let the flame create intense life
अग्निज्वाला घडवी तीव्र जीवन
उचंबळून येता आंतरिक भावना
घडू दे तीव्र जीवन अग्निज्वालांनी;
कल्पनेचे थवे मारे उंच उंच भरारी,
स्फूर्ती पाठवी शब्द आविष्काराचे;
सुवर्णशांतीचा महिमा असा की
येई दूरगामी महार्प्रज्ञेची ऋद्धी;
आमंत्रण आहे समृद्धीच्या मेजवानीचे,
सौराग्नीत शिजवलेली मूलपक्वान्ने;
आसमंतात जशी होई जागृताची फेरी
सुगंध दरवळे चोहीकडे नवकाव्याचा.
६ जून २०२५
Solar Flares: सौराग्नी

कल्पनेचे थवे मारे उंच उंच भरारी


Leave a comment