The Leaves of Palāsh Tree — 5

The Leaves of Palāsh Tree — 5

By

/

1–2 minutes

read

The Leaves of Palāsh Tree — 5

पळसाची पाने — ५

४१: हेमलॉकचा कप

सुज्ञ हूपुला प्यावे लागले प्यालाभर विष,

गुन्हा, म्हणे, शिकवीत होता पाखंडी तत्वज्ञान,

झाडाच्या सावलीत, बिघडवीत नवपिढीला.

४२: श्रेष्ठ पृथ्वी

शरीर होते जिवंत आत्म्याच्या अस्तित्वाने,

पण व्हावयास पाहिजे अग्नि-प्रज्वलित;

श्रेष्ठ पृथ्वी उभारली त्याच कारणास्तव.

४३: महाभूतांचे आकलन

कधीच नसे ऋतूंना आजार त्या पृथ्वीवर,

आहे त्यांचे भ्रमण तालाच्याही पलीकडे,

तसेच की, त्वरित आकलन सर्व महाभूतांचे. 

४४: भाकीत 

फांदीवर अचानक एक पक्षी पूर्वेकडच्या बागेत,

आणि गात गात रंगीत सुगंधी वाऱ्याची झुळूक;

सांगे, घडेल अद्भुत, सकाळी उद्या आठ वाजता. 

४५: दिव्य जीवनाचा प्रारंभ

प्रेमाचे गाणे जाई दाही दिशा, सगळीकडे :

जहाज-घराच्या भोजनगृहात झाली भेट;

नवीन वैभवशाली दिव्य जीवनाचा प्रारंभ.

४६: प्रकटीकरणासाठी

हे सर्वदाता, येऊ दे तुझ्या देणग्या स्वीकारता,

दे ते शक्तिशाली पेय, ते जे प्राशन केले मृत्यूने,

सर्वोत्तम प्रकटीकरणासाठी तर हे प्रयोजन.

४७: हे अतिथी 

हे अतिथी, आहे तुझे स्वागत ह्या यज्ञाकरता,

हो प्रभावी, हे सर्वज्ञाता, कर प्रज्वलित हवन,

अधिकामधे ओत अधिक, दिव्यत्व दिव्यात.

४८: सात अग्नी 

मी तुला महान सात अग्नी म्हणून संबोधतो,

खरोखर तुझ्यामुळेच आहेत सूर्य प्रकाशित;

पार्थिव देहात, पृथ्वीवरही, असू दे त्यांचे तेज. 

४९: माधुर्याचा वर्षाव

आलिंगले प्रियकरांनी एकमेका धृड प्रेरणेत :

“शिशु आहे निर्मात्याच्या प्रसन्नतेची स्वाक्षरी.”

आणि झाला आनंदाच्या माधुर्याचा वर्षाव.

५०: अद्भुत वचन

मृत्यूच्या रूपांतरात आहे सृष्टीचे सारे रहस्य

आणि दिसेल ते सात अग्नीच्या ज्वालातून;

आहे अद्भुत वचन हे,  विजयाची निश्चितता. 

22 May 2025

The Conference of the Birds by Farid al-Din Attar

6 responses to “The Leaves of Palāsh Tree — 5”

  1. RY Deshpande Avatar
    RY Deshpande

    Rendering into English by Akash Deshpande

    श्रेष्ठ पृथ्वी

    शरीर होते जिवंत आत्म्याच्या अस्तित्वाने,

    पण व्हावयास पाहिजे अग्नि-प्रज्वलित;

    श्रेष्ठ पृथ्वी उभारली त्याच कारणास्तव.

    Superior Earth

    Body animated by soul

    Must become a flame lit by Fire

    Superior earth was raised for that

    8 syllables

    महाभूतांचे आकलन

    कधीच नसे ऋतूंना आजार त्या पृथ्वीवर,

    आहे त्यांचे भ्रमण तालाच्याही पलीकडे,

    तसेच की, त्वरित आकलन सर्व महाभूतांचे. 

    Understanding the Elements

    Never are seasons ill on the earth

    Their cycles are beyond all rhythms

    As is the quick grasp of Elements

    9 syllables

    भाकीत 

    फांदीवर अचानक एक पक्षी पूर्वेकडच्या बागेत,

    आणि गात गात रंगीत सुगंधी वाऱ्याची झुळूक;

    सांगे, घडेल अद्भुत, सकाळी उद्या आठ वाजता. 

    Prophesy

    On a branch in the east garden

    A song bird and the fragrant breeze

    Foretell a miracle at eight

    8 syllables

    दिव्य जीवनाचा प्रारंभ

    प्रेमाचे गाणे जाई दाही दिशा, सगळीकडे :

    जहाज-घराच्या भोजनगृहात झाली भेट;

    नवीन वैभवशाली दिव्य जीवनाचा प्रारंभ.

    Commencement of Divine Life

    The song of love goes in all ten ways

    Meeting in the boat house dining room

    A new and rich life divine begins

    9 syllables

    प्रकटीकरणासाठी

    हे सर्वदाता, येऊ दे तुझ्या देणग्या स्वीकारता,

    दे ते शक्तिशाली पेय, ते जे प्राशन केले मृत्यूने,

    सर्वोत्तम प्रकटीकरणासाठी तर हे प्रयोजन.

    For Realization

    O All-giver, let your gifts be accepted

    Give that powerful potion which death has quaffed

    For supreme realization is the aim

    11 syllables

    सात अग्नी 

    मी तुला महान सात अग्नी म्हणून संबोधतो,

    खरोखर तुझ्यामुळेच आहेत सूर्य प्रकाशित;

    पार्थिव देहात, पृथ्वीवरही, असू दे त्यांचे तेज. 

    Seven Fires

    I call you the seven fires

    And by your light the sun is lit

    In earth and flesh let there be light

    8 syllables

    अद्भुत वचन

    मृत्यूच्या रूपांतरात आहे सृष्टीचे सारे रहस्य

    आणि दिसेल ते सात अग्नीच्या ज्वालातून;

    आहे अद्भुत वचन हे,  विजयाची निश्चितता. 

    The Wonderful Promise

    Creation’s secret is in death’s transformation

    Which will be seen through the flames of seven fires

    A wonderful promise, a certain victory

    12 syllables

    Like

  2. Soham Karandikar Avatar
    Soham Karandikar

    “गुन्हा, म्हणे, शिकवीत होता पाखंडी तत्वज्ञान” always happens but तत्वज्ञान always survives in the end.

    Like

  3. Soham Karandikar Avatar
    Soham Karandikar

    “सुज्ञ हूपुला प्यावे लागले प्यालाभर विष,

    गुन्हा, म्हणे, शिकवीत होता पाखंडी तत्वज्ञान,” was witty.

    Like

    1. RY Deshpande Avatar
      RY Deshpande

      This has a reference to Socrates. Check on the Internet.

      Like

      1. RY Deshpande Avatar
        RY Deshpande

        Soham Karandikar: “Interesting and appealing metaphor.”

        Like

      2. Soham Karandikar Avatar
        Soham Karandikar

        Oh I didn’t know that it was a reference to Socrates. I checked on the internet and was good to know. Thanks!

        Then my comment ” “सुज्ञ हूपुला प्यावे लागले प्यालाभर विष, गुन्हा, म्हणे, शिकवीत होता पाखंडी तत्वज्ञान,” was witty.” doesn’t hold anymore since I thought it was the तत्वज्ञान that was being called पाखंडी and not the philosopher.

        Like

Leave a comment