The Leaves of Palāsh Tree — 5
पळसाची पाने — ५
४१: हेमलॉकचा कप
सुज्ञ हूपुला प्यावे लागले प्यालाभर विष,
गुन्हा, म्हणे, शिकवीत होता पाखंडी तत्वज्ञान,
झाडाच्या सावलीत, बिघडवीत नवपिढीला.
४२: श्रेष्ठ पृथ्वी
शरीर होते जिवंत आत्म्याच्या अस्तित्वाने,
पण व्हावयास पाहिजे अग्नि-प्रज्वलित;
श्रेष्ठ पृथ्वी उभारली त्याच कारणास्तव.
४३: महाभूतांचे आकलन
कधीच नसे ऋतूंना आजार त्या पृथ्वीवर,
आहे त्यांचे भ्रमण तालाच्याही पलीकडे,
तसेच की, त्वरित आकलन सर्व महाभूतांचे.
४४: भाकीत
फांदीवर अचानक एक पक्षी पूर्वेकडच्या बागेत,
आणि गात गात रंगीत सुगंधी वाऱ्याची झुळूक;
सांगे, घडेल अद्भुत, सकाळी उद्या आठ वाजता.
४५: दिव्य जीवनाचा प्रारंभ
प्रेमाचे गाणे जाई दाही दिशा, सगळीकडे :
जहाज-घराच्या भोजनगृहात झाली भेट;
नवीन वैभवशाली दिव्य जीवनाचा प्रारंभ.
४६: प्रकटीकरणासाठी
हे सर्वदाता, येऊ दे तुझ्या देणग्या स्वीकारता,
दे ते शक्तिशाली पेय, ते जे प्राशन केले मृत्यूने,
सर्वोत्तम प्रकटीकरणासाठी तर हे प्रयोजन.
४७: हे अतिथी
हे अतिथी, आहे तुझे स्वागत ह्या यज्ञाकरता,
हो प्रभावी, हे सर्वज्ञाता, कर प्रज्वलित हवन,
अधिकामधे ओत अधिक, दिव्यत्व दिव्यात.
४८: सात अग्नी
मी तुला महान सात अग्नी म्हणून संबोधतो,
खरोखर तुझ्यामुळेच आहेत सूर्य प्रकाशित;
पार्थिव देहात, पृथ्वीवरही, असू दे त्यांचे तेज.
४९: माधुर्याचा वर्षाव
आलिंगले प्रियकरांनी एकमेका धृड प्रेरणेत :
“शिशु आहे निर्मात्याच्या प्रसन्नतेची स्वाक्षरी.”
आणि झाला आनंदाच्या माधुर्याचा वर्षाव.
५०: अद्भुत वचन
मृत्यूच्या रूपांतरात आहे सृष्टीचे सारे रहस्य
आणि दिसेल ते सात अग्नीच्या ज्वालातून;
आहे अद्भुत वचन हे, विजयाची निश्चितता.
22 May 2025


Leave a reply to RY Deshpande Cancel reply