The Leaves of Palāsh Tree — 4
पळसाची पाने — ४
३१: निर्देशांचा जन्म
असेल का पूर्व दिशा नसताना सूर्य,
मोठा प्रेमपूर जेंव्हा नसे निःशेष प्रेम?
— त्यांच्या करता तर जन्म निर्देशांचा.
३२: दिव्याविना रात्री उजेड
बी नव्हते लावलेले पण उगवले झाड,
दिव्याविना रात्री उजेड सगळीकडे;
अज्ञानात आहे भरलेले भरगच्च ज्ञान.
३३: मूल्य इहलोकीच्या जीवनाचे
धिटाईला मोल नाही आणि बसली ती फांदीवर,
कोणतीही भीती न बाळगता, पण आला पारधी;
क्षणात उमगले मूल्य इहलोकीच्या जीवनाचे.
३४: हे न्यारेच आध्यात्म
आहे हे आध्यात्म न्यारेच,
तनु अग्नीचा ह्रदय आनंदाचे,
मृत्यूविना शोध चिरकालाचा.
३५: एक विनवणी
वाहत नाहीत तुझ्या पंखातून कर्कश वारे,
हर्षित काळ नेई तुला काळाच्या पलीकडे,
आणशील का ते धन माझ्या विश्वातही?
३६: सदैव जागृत प्रेरणा
कोणतेही स्वप्न होत नाही कधीच विकृत तेथे,
नसे आंगण वाकडे, लयबद्धच नुपूरांचा झंकार;
पण कशी तू नाचशील रात्रभर ठेवूनी प्रेरणा?
३७: अभीष्ट कविता
भेटला मला एकदा उंचटसा कवि,
सदऱ्याच्या खिशात कागद-पेन्सिल,
सांगे, वाट पाहतो तरतरीत कवितेची.
३८: मोगऱ्याचा गुच्छ
स्वप्न दिसते मला चांदण्याने ओथंबलेले
अनोखे अकल्पनीय भूमीवरील तारकांना,
रात्रीच्या ह्रदयात सुगंधी गुच्छ मोगऱ्याचा.
३९: नक्षीधार झोपाळा
आजोबाच्या घरी महोगनीचा झोपाळा,
छान कोरीव काम सांगे पिढ्यांच्या आठवणी,
त्यांच्या आजोबांच्या, छायेखाली फुलणाऱ्या.
४०: सर्वोत्तम प्रकाशाकडे
गाठूनी अगम्य शब्दबोधाचा अभीष्ट उचांक
जात आहे तो तिथे जिथे नसे रात्र वा स्वप्न,
दिसू लागला परिपूर्णतेचा सर्वोत्तम प्रकाशच.
20-21 May 2025
Mahogany Tree

आजोबाच्या घरी महोगनीचा झोपाळा

Leave a comment