The Leaves of Palāsh Tree — 4

The Leaves of Palāsh Tree — 4

By

/

1–2 minutes

read

The Leaves of Palāsh Tree — 4

पळसाची पाने — ४

३१: निर्देशांचा जन्म 

असेल का पूर्व दिशा नसताना सूर्य,

मोठा प्रेमपूर जेंव्हा नसे निःशेष प्रेम?

— त्यांच्या करता तर जन्म निर्देशांचा.

३२: दिव्याविना रात्री उजेड

बी नव्हते लावलेले पण उगवले झाड,

दिव्याविना रात्री उजेड सगळीकडे;

अज्ञानात आहे भरलेले भरगच्च ज्ञान.

३३: मूल्य इहलोकीच्या जीवनाचे

धिटाईला मोल नाही आणि बसली ती फांदीवर,

कोणतीही भीती न बाळगता, पण आला पारधी;

क्षणात उमगले मूल्य इहलोकीच्या जीवनाचे.

३४: हे न्यारेच आध्यात्म 

आहे हे आध्यात्म न्यारेच,

तनु अग्नीचा ह्रदय आनंदाचे,

मृत्यूविना शोध चिरकालाचा.

३५: एक विनवणी 

वाहत नाहीत तुझ्या पंखातून कर्कश वारे, 

​हर्षित काळ नेई तुला काळाच्या पलीकडे,

आणशील का ते धन माझ्या विश्वातही?

३६: सदैव जागृत प्रेरणा

कोणतेही स्वप्न होत नाही कधीच विकृत तेथे,

नसे आंगण वाकडे, लयबद्धच नुपूरांचा झंकार;

पण कशी तू नाचशील रात्रभर ठेवूनी प्रेरणा?

३७: अभीष्ट कविता 

भेटला मला एकदा उंचटसा कवि,

सदऱ्याच्या खिशात कागद-पेन्सिल,

सांगे, वाट पाहतो तरतरीत कवितेची. 

३८: मोगऱ्याचा गुच्छ 

स्वप्न दिसते मला चांदण्याने ओथंबलेले

अनोखे अकल्पनीय भूमीवरील तारकांना,

रात्रीच्या ह्रदयात सुगंधी गुच्छ मोगऱ्याचा. 

३९: नक्षीधार झोपाळा 

​आजोबाच्या घरी महोगनीचा झोपाळा, 

​छान कोरीव काम सांगे पिढ्यांच्या आठवणी, 

त्यांच्या आजोबांच्या, छायेखाली फुलणाऱ्या. 

४०: सर्वोत्तम प्रकाशाकडे 

गाठूनी अगम्य शब्दबोधाचा अभीष्ट उचांक 

जात आहे तो तिथे जिथे नसे रात्र वा स्वप्न,

दिसू लागला परिपूर्णतेचा सर्वोत्तम प्रकाशच. 

20-21 May 2025

Mahogany Tree

आजोबाच्या घरी महोगनीचा झोपाळा

One response to “The Leaves of Palāsh Tree — 4”

  1. RY Deshpande Avatar
    RY Deshpande

    Here is a rendering of three pieces into English by Akash Deshpande:

    ३७: अभीष्ट कविता 

    भेटला मला एकदा उंचटसा कवि,

    सदऱ्याच्या खिशात कागद-पेन्सिल,

    सांगे, वाट पाहतो तरतरीत कवितेची. 

    Desirable Poem

    I once met a tallish poet

    With pen and paper in his shirt pocket

    He said, I’m waiting for an enlivening poem

    ३८: मोगऱ्याचा गुच्छ 

    स्वप्न दिसते मला चांदण्याने ओथंबलेले

    अनोखे अकल्पनीय भूमीवरील तारकांना,

    रात्रीच्या ह्रदयात सुगंधी गुच्छ मोगऱ्याचा. 

    Jasmines

    I see a dream drenched in starlight

    Unknown, unimaginable to the luminaries on earth

    In the heart of the night a fragrant bouquet of jasmines

    ४०: सर्वोत्तम प्रकाशाकडे 

    गाठूनी अगम्य शब्दबोधाचा अभीष्ट उचांक 

    जात आहे तो तिथे जिथे नसे रात्र वा स्वप्न,

    दिसू लागला परिपूर्णतेचा सर्वोत्तम प्रकाशच. 

    Toward the Supreme Light

    Attaining the unattainable acme desired of word-sense

    He goes to a place where there is no night nor dream

    And sees the supreme light of emerging perfection

    Like

Leave a reply to RY Deshpande Cancel reply