In me I hold the secrets of creation
मीच अनंताची गुपिते धारणारी सृष्टि
नसे केवळ जिज्ञासा उत्कट जीवनाची
आहे भावना आंतरिकतेच्या साफल्याची ।
रज्जु-सर्पाची कालची गोष्ट आहे खोटी
मोठा भ्रम जाय, सत्यचि सत्याच्या पोटी ।
प्रोत्साहनाचा वाहता मधुर हा ओहोळ,
अमृतचि, गोडी भोक्त्याची, चोखंदळ ।
आले दुरून चाहते, रसज्ञ, गुणवंत,
न दिसणाऱ्या तारकांचे कौतुक सांगत ।
एक म्हणे मी आहे छोटी पण झंझावाती
माझ्या तुफानी डौलात पर्वतहि झुलती ।
पहा पहा ग्रंथांचे भांडार, गूढत्वाची रास,
प्रज्वलित माझे कर्तृत्व, थोरले हमखास ।
मी आहे अंतराळातून आलेली नवी दृष्टि
मीच अनंताची गुपिते धारणारी सृष्टि ।
31 March 2025

Leave a reply to Gauri Mahesh Karandikar Cancel reply