In me I hold the secrets of creation

In me I hold the secrets of creation

By

/

1–2 minutes

read

In me I hold the secrets of creation

मीच अनंताची गुपिते धारणारी सृष्टि 

नसे केवळ जिज्ञासा उत्कट जीवनाची 

आहे भावना आंतरिकतेच्या साफल्याची ।

रज्जु-सर्पाची कालची गोष्ट आहे खोटी 

मोठा भ्रम जाय, सत्यचि सत्याच्या पोटी  ।

प्रोत्साहनाचा वाहता मधुर हा ओहोळ,

अमृतचि, गोडी भोक्त्याची, चोखंदळ ।

आले दुरून चाहते, रसज्ञ, गुणवंत,

न दिसणाऱ्या तारकांचे कौतुक सांगत ।

एक म्हणे मी आहे छोटी पण झंझावाती 

माझ्या तुफानी डौलात पर्वतहि झुलती ।

पहा पहा ग्रंथांचे भांडार, गूढत्वाची रास,

प्रज्वलित माझे कर्तृत्व, थोरले हमखास ।

मी आहे अंतराळातून आलेली नवी दृष्टि

मीच अनंताची गुपिते धारणारी सृष्टि 

31 March 2025

2 responses to “In me I hold the secrets of creation”

  1. Gauri Mahesh Karandikar Avatar
    Gauri Mahesh Karandikar

    Beautiful! Shrushti is the expression of the magnificent divine energy

  2. Soham Karandikar Avatar
    Soham Karandikar

    Beautiful poem

Leave a Reply

Discover more from The Winds of Wonder

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading