Welcome to Man beyond Man

Welcome to Man beyond Man

By

/

1–2 minutes

read

Welcome to Man beyond Man

नवमानवाचे आगमन

अमृताचा ठेवा देहाची सार्थकता 

खटाटोप मोठा धैर्य न ढळता ।

अचानकच घडले एके दिवशी 

दैवाच्या उंचावल्या राशीच्या राशी ।

फुटला सोन्याला टवटवीत अंकुर 

कधी न होणारे स्वप्न झाले साकार ।

उद्याच्या उरात आहे चिरकाल प्रकाश 

धजे न तेथे अंधत्वाचा एकहि अंश ।

कुंठल्या  अपहृत नियतीच्या विवंचना 

उद्ध्वस्त झाल्या खोटेपणाच्या रचना ।

चैतन्यरूपाचा अद्भुतच उत्सव

ऐका ऐका हो येत आहे नवमानव ।

जवळचे दूरचे विशाल दृष्टि पाही 

त्याच्या शिवाय दुसरे नसे काही ।

30 March 2025

2 responses to “Welcome to Man beyond Man”

  1. Soham Karandikar Avatar
    Soham Karandikar

    “जवळचे”, “दूरचे”, “विशाल दृष्टि” and “पाही” are all the same as the “नवमानव”

    Like

  2. Soham Karandikar Avatar
    Soham Karandikar

    Are “जवळचे”, “दूरचे”, “विशाल दृष्टि” and “पाही” all the same as the “नवमानव”? 

    Liked by 1 person

Leave a comment