Welcome to Man beyond Man
नवमानवाचे आगमन
अमृताचा ठेवा देहाची सार्थकता
खटाटोप मोठा धैर्य न ढळता ।
अचानकच घडले एके दिवशी
दैवाच्या उंचावल्या राशीच्या राशी ।
फुटला सोन्याला टवटवीत अंकुर
कधी न होणारे स्वप्न झाले साकार ।
उद्याच्या उरात आहे चिरकाल प्रकाश
धजे न तेथे अंधत्वाचा एकहि अंश ।
कुंठल्या अपहृत नियतीच्या विवंचना
उद्ध्वस्त झाल्या खोटेपणाच्या रचना ।
चैतन्यरूपाचा अद्भुतच उत्सव
ऐका ऐका हो येत आहे नवमानव ।
जवळचे दूरचे विशाल दृष्टि पाही
त्याच्या शिवाय दुसरे नसे काही ।
30 March 2025

Leave a reply to Soham Karandikar Cancel reply