चंदनाचे झाड
चंदनाचे झाड वाढले मागे परसात
पसरे फुलांचा सुगंध जगभरात ।
हांक ती तर हर्षध्वनिने दिलेली
उल्हसित उत्कंठेला लाभलेली ।
निःशब्दतेत झाला स्फोट गंभीर,
वाहू लागली धन्य स्तुती झरझर ।
हासत नाचत येई उद्याची कविता
अर्थगर्भित भविष्याचीच संहिता ।
सहाणेवर उगाळले मंत्र नवे नवे
शतकोटि देवतांची घेत नावे ।
वाढे भव्य चंदनाची वैभव-संपदा
सर्वत्र रक्त चंदनाचीच प्रतिष्ठा ।
चंदनाचा प्रपंच, चंदनाचे हावभाव,
चंदनाचा देव्हारा, चंदनाचाच देव ।
9 March 2025
Sandalwood cultivation

From the Internet

Sandalwood Flowers

Sandalwood Fruits


Leave a comment