The bird with crimson wings
किरमिजी पंखाचा पक्षी
डहाळीवर नवीनच पक्षी बसला होता
आला काही रहस्य शोधता शोधता ।
आवाजात आर्तता होती उत्सुकतेची
स्वरात भाव-किमया नवनिर्मितीची ।
पंख होते चमकदार, किरमिजी,
दीप्तिवन्त, दिव्य अग्निचीच तेजी ।
निद्रा आहे म्हणूनच स्वप्न चंदेरी
तो आहे आणि त्याचीच गैरहजेरी ।
आनंदाच्या भरात होई वेदना
वाढवीत वाढवीत परस्परांना ।
अमरत्वाने स्वीकारले मृत्युधन
घडविण्याशी जडत्वाचे परिवर्तन ।
समृध्दीचा वाकबगार इथे आला
देहाचे चैतन्यत्व प्रतिष्ठापणाला ।
3 March 2025



Leave a comment