The bird with crimson wings

The bird with crimson wings

By

/

1–2 minutes

read

The bird with crimson wings

किरमिजी पंखाचा पक्षी 

डहाळीवर नवीनच पक्षी बसला होता 

आला काही रहस्य शोधता शोधता ।

आवाजात आर्तता होती उत्सुकतेची 

स्वरात भाव-किमया नवनिर्मितीची ।

पंख होते चमकदार, किरमिजी,

दीप्तिवन्त, दिव्य अग्निचीच तेजी ।

निद्रा आहे म्हणूनच स्वप्न चंदेरी 

तो आहे आणि त्याचीच गैरहजेरी ।

आनंदाच्या भरात होई वेदना 

वाढवीत वाढवीत परस्परांना ।

अमरत्वाने स्वीकारले मृत्युधन

घडविण्याशी जडत्वाचे परिवर्तन ।

समृध्दीचा वाकबगार इथे आला

 देहाचे चैतन्यत्व प्रतिष्ठापण्याला ।

3 March 2025

3 responses to “The bird with crimson wings”

  1. Caleb Cheruiyot Avatar
    Caleb Cheruiyot

    Wonderful ♥️

    Like

  2. Vivek Datar Avatar
    Vivek Datar

    ह्या कवितेची स्फूर्ति आपल्याला कशी मिळाली? Scarlet Minivet तुम्ही पाहिलात का? त्याचे येणे थांबले असावे व त्यानंतर तुम्हाला काय वाटले हे चांगल्या प्रकारे प्रस्तुत केले आहे.

    Like

    1. RY Deshpande Avatar
      RY Deshpande

      केंद्र बिंदू हा असा:

      देहाचे चैतन्यत्व प्रतिष्ठापण्याला डहाळीवर नवीनच पक्षी 

      Like

Leave a reply to Vivek Datar Cancel reply