साखरखेड्याची गोष्ट — The Story of Sugar Village
दाट वनराईच्या पल्ल्याड
आर्यभूषित साखरखेड
आनंदाचा गोडवा साखरेचा मळा
स्मित-आश्चर्यांचा सोहळा
गुऱ्हाळी गर्दी देवगणांची
बैठक भरली सप्तस्वरांची
हांक तुतारीची आसमंतात
थवेच्या थवे नील गगनात
मिथ्यापण नसे मृत्यू नसे
अग्नितप्त देहची असे
मधुरच सृष्टी माधुर्याची
उगमाकडे धांव उगमाची
अद्भुत चैत्यपुरुष घडवी
अमृतत्वाची थोरवी
५ फेब्रुवारी २०२५

Leave a reply to RY Deshpande Cancel reply