सोनचाफा : माझ्या काही निवडक कविता (Marathi Edition) Kindle Edition
उदात्त आवाज आणि उत्स्फूर्त ओघ हे भारदस्त काव्याचे वाङ्मयिन वैशिष्ट्य उंचावणारे प्रतिष्ठित वैभव ठरते. त्यात तीव्र उत्साह आणि धावता शब्दप्रवाह एकाच ठिकाणी येतात. ते जोरकस रीतीने यावे हे भाषेच्या क्रियाशीलतेकरिता आवश्यक आहे. वेद उपनिषदांच्या प्राचीन ऋषी-कवींनी मंत्र उच्चारण केले ते सर्वात अंतरंग आणि जवळजवळ गुप्त सत्य आहे ते पाहण्यासाठी. तिथे अंतर्ज्ञानी प्रकटीकरणात्मक प्रेरणा मूर्त रूप घेते. ती एक सर्वोच्च लयबद्ध भाषा आहे. श्रेष्ठतेचा हा पल्ला गाठण्याकरता मराठी भाषा संपन्न आहे का हा प्रश्न उद्भवणे साहजिकच आहे. आज तरी ते दिसत नाही. पण अमृताच्या पैजा जिंकणारी मराठी त्याच्याकरता तयार होऊ शकते. त्यातच तिची पूर्तता राहील. अध्यात्म आता पुढे गेलेले आहे, नव्या प्रखर चिद्विलासाच्या क्षमतेत, अग्नीच्या तेजाने दिव्य क्रियाशील शक्तीच्या विलासात, कार्यसिद्धीत, उच्चतम प्रकृतीच्या समृद्धीत, त्या आविष्कारात. आशावादी दृष्टिकोनातून भविष्याच्या उज्वलतेतुन सांगायचे तर, त्यातच उन्मलीत होऊन नवीन काव्य वैभवी सौंदर्यशिल सृष्टीची निर्मिती करेल, ते अगम्य भोक्तेपण आस्वादिल.
पहिली कविता
०१: देव आला देवाच्या घरी
देव आला देवाच्या घरी
उभारली नवी पंढरी ।
सोने उगवले शेतीभाती
प्रेमपूर्णेची दुथडा भरती ।
रात्र नसे तरी दीपोत्सव
अद्भुत किमया की सर्व ।
बहरले विशाल प्रांगण
चिवचिवाट हर्षाची गुणगुण ।
सडा चोहीकडे प्राजक्ताचा
फोफावला वृक्ष आनंदाचा ।
देव आला देवाच्या घरी
खायी आवडीची भाकरी ।
चैतन्यनगरीचा देव
वाढवी समृद्धीचे वैभव ।
२९ जानेवारी २०२५
Here is the PDF:

Leave a comment