A Fable of the amazing Pice

A Fable of the amazing Pice

Category:

, ,

By

/

1–2 minutes

read

A Fable of the amazing Pice

अद्भुत दमडीची कहाणी

मागितले एकदा मानसपुत्राने बक्षीस,

दिली गोंडस दमडी हातात होती ती;





नाचत नाचत गेली गावाच्या बाजारात,

घेतले विकत रंगरंगीत बत्तासे खूप;





ठेवला सकाळी एक देव्हाऱ्यात पूजा करून,

बाकीचे वाटले बालशाळेत मुलामुलींना;





हर्षाचा चेंडू गेला उंच उंच निळ्या आभाळात

आणण्या तेथील समृद्धीचे धन दमडीकरिता;





कपिलेच्या दुधात पडला वाडगाभर मध,

व झाले पूर्ण अर्थाने मधुर सगळेची विश्व;





तेव्हड्यात आणला वाऱ्याने केवड्याचा सुगंध,

आणि थरथरला आनंद उत्फुल्ल जीवनात;





भक्तिभाव असा ह्या उल्लेखनीय दमडीचा,

मिळाला प्रसाद चांदीच्या भल्या मोठ्या ताटात;





तिने केले अपेक्षेचे आत्मह्रदय आशावादी,

आणि प्रखर अग्नी झाला अजून प्रज्वलित.

१८ ऑगस्ट २०२५

बत्तासे

One response to “A Fable of the amazing Pice”

  1. RY Deshpande Avatar
    RY Deshpande

    Battasa is a sweet made from sugar. It is small, light, and usually white in colour. It is used in religious ceremonies and as an offering.

    बत्तासे म्हणजे साखरेपासून बनवलेली एक मिठाई. ती लहान, हलकी आणि साधारणपणे पांढऱ्या रंगाची असते. बत्तासे धार्मिक कार्यांमध्ये आणि नैवेद्य म्हणून वापरले जातात. [Internet]

    Like

Leave a reply to RY Deshpande Cancel reply