My Shadow
माझी सावली
टक लाऊन पाहत आहे मी माझ्या सावलीकडे,
तल्लख आहे ती, जादूचा पोशाख लेऊन आलेली;
भल्या प्रकाशात, पायाजवळच, मी आहे म्हणून,
साथ देई पदोपदी, खरी दिशा कुठेही न चुकता;
साधले ह्रस्वदीर्घ ते, धावणाऱ्या काव्यालालित्यात,
भूषवी अस्तित्वाची गूढगहणता, खोल अर्थाची;
उत्सुकतेने जसा जसा उतरे मी तिच्या आंतरात,
दिव्यत्वाची अद्भुतताच वाट पाहे प्रकटण्याची;
सोबतीन म्हणे, मलाही द्या समृद्धीचे वरदान,
करीन परिपूर्ण जीवन मृत्यूहीन जीवनात;
जशी शोधे चांदणी परवलीचा शब्द चांदरातीत
सापडे तिला अग्नीतत्व स्थापिलेले पुरातनकाळी.
१० ऑगस्ट २०२५



Leave a reply to Soham Karandikar Cancel reply