An Attempt in Surrealism
अतिवास्तवता
कोसांचा प्रवास पण पाय धरतीचे जडच,
न दिसे काव्यसृष्टी, ती उभटशा अंगाची;
चंद्र, तो तर गेला कोरड्या नदीत वाहून,
पण लगेच आला धो धो भला मोठ्ठा पाऊस;
घसरली उत्तरेकडची हडबडी कल्पना,
जरी हातातील कडे दिले होते विष्णूने;
शंखाची उत्स्फूर्त गर्जना, फाटले आकाशही,
निःशब्दतेने अर्थच अर्थ केले खूप गोळा;
खट्याळ घड्याळाने मांडला क्रूर हाहाकार
काळाची तिन्ही चाके फिरू लागली मागेमागे ;
आरशात दिसली वास्तविकता चमत्कारीक,
कारण होते कालच्या काळोख्या रात्रीचेच;
ह्यात सख्यासोयरांचे उगीचच येणे जाणे,
नको होते भुरळी आलिंगने, त्या भेटीही;
फटकावलेला हसरा चेंडू झाला दिसेनासा,
गवसले असेल का त्याला अर्चीले होते ते?
मघाशी सांगितलेली गोष्ट सांगतो पुनः
हिरवट मोत्यांचा हार झळकेल छातीवर;
गेली पळून मागच्या दाराने हिमट भीती,
मंदिरात टाकला सुटकेचा सुस्कारा देवाने;
आज तर आहे टिटवाळ्याची महा यात्रा,
आले अनेकवचनीय उद्गार घेण्या रेवड्या.
३० जून २०२५

Leave a reply to RY Deshpande Cancel reply