Multiplication laid out to bring all-round abundance
गुणाकार मांडीला आणण्या सर्वांगी बहुत्व
गेले शाश्वताचे बहिरेपण, “मीच”चा हट्ट,
गतिमान असे ध्वनी, खणखणीत बोलणे;
ऐकू येई सोनेरी चाहूल कोवळ्या भविष्याची
धावे आकाशातील नवगंगा दक्षिणेकडे;
प्रज्वलित झाला वर्षानुवर्षांचा सोत्कंठ देह,
सप्तज्वालांनी वाढविलेले थोर पुण्यधन;
जागृत कुंडलीची फुंकार साती ठिकाणी,
खालीवरही, प्रकाशित झालेल्या पार्थिवेत;
लहान मोठ्या क्षणात आहे सिद्धीसामर्थ्य
देण्या चालना स्तंभित नियतीच्या प्रेरणेला;
झळाळी नाही सावली क्षुद्र मनोविकृतीची,
प्रगल्फतेची झगझगीत उत्कृष्ट ज्योत ती;
पहा, आवेग ग्रंथच्या मोठे ग्रंथ लिहिण्याचा,
एकाच निर्मळ झऱ्यातून नवलाईचे प्रवाह;
संपले जवळचे-दूरचे, सारी नाते एकत्वात,
तरी राखुनी आदरणीय वैयक्तीकता स्वची;
बदलून निष्क्रियता जाणते प्रकटीकरण
हाची महान संकल्प घडवी नूतन सृष्टी;
गुणाकार मांडीला आणण्या सर्वांगी बहुत्व,
कानाने श्रवण त्याचेच आता ठायी ठायी.
९ जून २०२५
A note apropos of deafness बहिरेपण
Beethoven’s deafness was a progressive and eventually total hearing loss that began in his late 20s; at the age of he 40 was completely deaf, yet this was when he wrote his most famous symphony – Symphony No. 9, also known as The Ninth. Beethoven premiered the Symphony on 7 May 1824 in the Theater am Kärntnertor in Vienna. There was the long outstanding applause but he was absolutely unable to hear anything. [Internet]
कानाने श्रवण आता ठायी ठायी — Hearing with the ear is now everywhere.

Leave a reply to Soham Karandikar Cancel reply