In the sight of an eagle

In the sight of an eagle

By

/

1–2 minutes

read

In the sight of an eagle

गरुडाची दृष्टी

स्वतःलाच पाहण्या सृष्टीची दृष्टी,

चमत्कार असे तिच्या प्रगल्भतेत:

तृण फुले पक्षी प्राणी तारामंडळे,

विहंगम गीत खाली वर चोहीकडे,

धबधब्याचा धबधब ध्वनी दुरुनी,

कल्लोळ स्वानंदाचा आकाशभर;

गरुडाची दृष्टी सारे विश्व व्यापणारी,

पाही ती इथे होणारी अद्भुत किमया;

नसे दुःख नसे वेदना नसे काळोख,

खोल शिरता दिसे लक्ख प्रकाशच;

झोप ती साफल्याची बाळगे यश,

स्वप्नांकीत नव्या आशा वास्तवतेच्या;

अंगणातला वृक्ष वाढे पूर्ण रूपात

अर्पण्या त्याची अर्चना गगनाला;

उजाडत आहे झगझगीत दिवस,

जे ठरविले होते पूर्वी घडे ते आता.

८ जून २०२५

The Vision of Nature

One response to “In the sight of an eagle”

  1. RY Deshpande Avatar
    RY Deshpande

    ☺️ आपल्या मनाची प्रसन्नता आपल्या काव्यात प्रतिबिंबित झालेली असते. Mrs Modak

    Like

Leave a reply to RY Deshpande Cancel reply