I am the Lord of the Nations
मी आहे स्वामी राष्ट्रांचा
क्रूर, नेसूनि घट्ट जाडजूड काळे धोतर,
करुनि अंधाराच्या कांबळीचे उपरणे,
बाळगून दुष्ट हेतू ओसाड उध्वस्थतेचा
आला होता नियतीच्या स्वयंपाकघरात;
हातात होती मोठी पळी जुन्या लोखंडाची
शिजत असणाऱ्या अन्नात टाकण्या विष,
जहर भात-भाजीत, कढईभर आमटीत;
घोर निद्रेत जागृतीत धावे धावे दुर्दैव,
दृष्ट लागणारी नजर करी सर्वनाश,
साध्य होई शत्रुत्वाने नकाराचे उद्दिष्ट;
उसाच्या मळ्यात कलुषित झाल्या भेल्या,
बनला काळ, ढकलीत घड्याळ मागे,
मोठ्या लाल विंचवाचा डंख प्राण घेण्या;
म्हणे, मी आहे बलवान स्वामी राष्ट्रांचा,
झुकती माझ्याच चरणी श्रेष्ठ म्हणणारे;
भ्रम हा मी आलो घालविण्या देवाचा,
कुठला तो, केवळ शून्यच आहे खरे;
उद्भवले हे शून्यातून शून्यात जाण्यास.
७ जून २०२५
The Spirit of Denial
Adapted from a Painting by Huta

The Antagonist


Leave a comment