A nectar of the gods
पंचामृत — दूध-दही-तूप-साखर-मध
पंचामृत दूध, दही, तूप, साखर आणि मध या पाच घटकांचे मिश्रण आहे. देवांना अर्पण करण्यासाठी आणि धार्मिक विधींमध्ये ह्याचा वापर होतो. हे घेतल्याने शरीरातील ७ धातू वाढतात आणि शरीर बळकट होते.
दूध — शुद्धता आणि पवित्रता; दही — समृद्धीचे प्रतीक; तूप — शक्ती आणि विजय; मध — समर्पण आणि एकाग्रता; साखर — आनंद आणि गोडवा.
पंचामृतस्नान हा एक देवपूजेतील उपचार मानला गेला आहे. पूजा झाल्यानंतर देवतेचे तीर्थ म्हणून पंचामृत सेवन करण्याची पद्धती आहे.
गर्भवती स्त्रीने तिच्या आणि गर्भाच्या उत्तम वाढीसाठी दररोज पंचामृत प्यावे असे ज्योतीसतत्त्व या ग्रंथात सांगितले आहे.
[From the Internet]
काव्यातील थोडीशी विविधता आणि गोडवा रसाळतेने आस्वादन्याचा हा एक प्रयत्न आहे.

Leave a reply to Soham Karandikar Cancel reply