The Leaves of Palāsh Tree — 3
पळसाची पाने — ३
२१: पोहोचे संगीत धामा शांततेच्या
इच्छिले त्याने संगीत, आणि जन्मले सा-रे-ग-म,
पण बघा की, हे न अडखळणारे सूर,
— अष्टकाचा ध्यास पोहोचण्या धामा शांततेच्या.
२२: ढग नाहीत पण …
ढग नाहीत पण पडत आहे पाऊस,
वीणा नाही पण येतो मधुर आवाज,
— निराकाराच्या रूपात आहे सौंदर्य.
२३: आहे का खात्री?
ह्या नभाची नसे पक्षाला खात्री,
वाहत्या पाण्याची मासोळीस,
— काव्याला भरोसाच्या स्फूर्तीची.
२४: वाट पाहे पृथ्वी
आकाश आहे म्हणूनच हा निळा रंग,
वायू-अग्नि-जल रूप देई अमूर्ततेला,
— वाट पाहे पृथ्वी सत्यदेहाच्या संपदेची.
२५: इथे लटकलेले शेपूट
काय सांगावी महानता त्याची, तो चतुष्पाद,
न दिसती तीन ह्या अलीकडच्या दृष्टीला,
— शेपूट मात्र आहे त्याचे लटकलेले खाली.
२६: कोकिळेचे दुःख
कोकिळेचे दुःख आणि ते वसंतात?
प्रियकराच्या वियोगात हरवले गाणे;
— पण येई तरी परिहाराची कुहू कुहू.
२७: आडवे उभे धागे
बाभळीच्या झाडावर सुगरणीचे घरटे,
धावती धागे आडवे उभे, कौशल्याचे;
—जीवनाचे भविष्य वीणे काळ तसेच.
२८: प्रभावी हाक
शाश्वत आहे पाहत वाट क्षणाच्या येण्याची,
होता तो दडलेला गहन अंधारी विवरात,
— पण गेली प्रभावी हाक काहीही न जुमानता.
२९: छायेचे पर्यटन
केली तयार त्यांनी छायेची होडी
घनदाट अंधारात रात्रभर बसुनी,
—छायाच करे तिच्यात लांबचे पर्यटन.
३०: कशाचाही न होई नाश
कधीच करता येत नाही नाश कशाचाही,
असो अंतराळातील नक्षत्रांचे असंख्य समूह
वा गहन रिक्तता, महाशून्य शक्तिशाली.
19 May 2025
This certainly is not “haunt of Ignorance, home of Pain” or Keats’s “nest of pain”. It is flooded with creative joy.

Leave a comment