The Leaves of Palāsh Tree
पळसाची पाने
०१: तीन पक्षी
उंच आकाशात उडाले तीन पक्षी;
एकाचे पंख होते तपकिरी लाल,
पाचूचा रंग दुसऱ्याच्या चोचीचा,
बघा आहे येत, म्हणाला तिसरा,
सोनेरी प्रभा नव्या आविष्काराची.
०२: परिपूर्णता
प्रसन्नता ह्या आनंदोत्सवात, —
परिपूर्ण जीवनात येईलच ती:
सत्यधारक होईल गुण स्थूलाचा,
लहाण्यात-मोठ्यात असेल सूक्ष्म,
कारणभूत देह अग्निदिव्यातच.
०३: हे कसे?
नळ नाही पण घागरीत पाणी,
आवाज येतो पण घंटा नाही;
— पळस नाही पण पाने तीन.
०४: हल्ला
असेल का देव देवळात?
सात वाजता गेली गुरे चरायला,
— लपलेला आहे क्रूर झुडपात.
०५: वाऱ्याची झुळूक
काळ्या रंगाची आली वाऱ्याची झुळूक
घेत घेत हसणारी झाडी विश्वासात,
— आणि चमत्कार, तीच झाली शुभ्र.
०६: महानता
मुंगी वाहे साखरेचा कण,
हत्ती उसाचा जाडजूड भारा,
— भूमी भगवंताचा थोर गोडवा.
०७: गुपित
आहे ते आरशात दिसेल, हो,
पण जे नाही तेही दिसेल का?
— पोकळीतील गुपित सापडेल का?
०८: न लागे मौल्यवान धातू
ह्या बाणाला न लागे धनुष्य,
ह्या अर्थाला ने लागे शब्द,
— भावना ज्यांना ने लागे हृदय.
०९: नाहीत ग्रंथालयात ग्रंथ
झोप पण नव्हते पाहिले स्वप्न,
मोठे भव्य ग्रंथालय, भरलेले,
— पण तेथे नव्हता एकही ग्रंथ.
१०: योजना नसे ती कुठे?
सुख आहे दुःखातही, नसे ते कुठे?
खरंच, अंधारातूनही पसरे प्रकाश,
— मृत्युमुळेच तर घडे आताचे जीवन.
१६-१७ मे २०२५
The Flame of the Forest — Butea Frondosa
The Mother: Beginning of the supramental realisation


Leave a reply to RY Deshpande Cancel reply