This love only with a single objective
ह्या प्रेमभरणीत एकच ध्यास
आश्चर्य की! घडत आहे हे युगायुगानंतर,
एक अतुलनीय क्षण, अद्भुत अलौकिक क्षण,
हा असा, स्थिर, शांत भरीव, आहे उभा,
गतिमान शाश्वत अद्भुततेने पाहत आहे;
भाग्यशाली काळाच्या अधिष्ठात्याने झेललेला,
दिव्य देहाची योजना करण्यासाठी तो क्षण,
अलगद आनंदाने घट्ट धरलेली सुसंधी;
एका आवेशी अविश्वसनीय महासागराने
ओतले आहे स्वतःला एका महासागरात,
माधुर्य माधुर्यामध्ये पूर्ण समरस झालेले,
सोनेरी मधात सोनेरी मध, दिवसात दिवस;
एकरूप होऊन अथांग ते परिपूर्ण जीवन
करीत आहे लुसलुशीत शेताला उल्हसित;
प्रियेचे सुंदर रेखीव आंतरिक आकर्षण
आणले आहे प्रेम-प्रितीने निदर्शनास, बाहेरही,
दृष्टीला टाकले दाखवून, केले आहे प्रसन्न;
आणि खुलवूनि सौंदर्याच्या आनंदी जादूने
केले तिने मोहित प्रियकराच्या नश्वर आत्म्याला;
आकाशभर थोरला गोडवा आणला प्रियतमेने
आणि टाकल्या काढून त्याच्या पुरातन जखमा;
केले नष्ट द्वैत आत्मा आणि जड पदार्थातील,
कालातीत, कठोर, श्रेष्ठतेच्या आड येणारे,
गेला भौतिक आणि आत्मिकतेतील विरोध;
करीत आहे चेहेऱ्यावर नृत्य उल्हसित थोरवी
सौंदर्य आणि आकर्षण यांची, भरगच्च आनंदी;
पण होता एकच मोठा ध्यास ह्या प्रेमभरणीत,
आणि तो ध्यास, असण्याचा एक रूपांतरीत देह,
दिव्य क्रियाशील देह चमत्कारिक मृत्युलोकीही;
असेल असा देह जशी काही अभिनव वीणा,
अनंताचे संगीत प्रदान करणारी, अनंतताची,
आत्म्याच्या बहुविध महानतेमधे प्रकटणारी;
असेल सोनेरी-नारंगी ज्वलंत अग्नीचे पात्र,
चैतन्यमय भांडे, त्याची तनु, श्वास घेणारी;
उमललेली आहेत बागेत सर्वत्र नवीन फुले
आनंदी, आणि करीत आहेत गोळा मधमाश्या
नवीनतम मध, सर्वत्र नवीन नवीन आविष्कार;
स्वीकारुनी देहाचा चैतन्यशील पदभार,
उजळीत आहे पुष्कराज अग्नी जीवनाचे वैभव,
येईल तो घेऊन मृत्यूहीन अमृतमय देह,
आणि होईल प्रत्यक्षात पृथ्वीवर ज्ञानपुरुष.
१४ मे २०२५
14 May 2025
The featured image is a painting by Huta, Savitri The Book of Love Book Five Canto Three
Love’s Alchemy


Leave a comment