The black angel speaks
काळ्या देवदूताचे वक्तव्य
सांगे उपहासात्माकतेने काळाकभीन्न देवदूत,
आहे देव तुझा दुष्ट फरशीवर फेकणारा तुला;
काळ्या कोळ्याच्या जाळ्यात अडकलेला जीव,
म्हणतोस आणेन प्रकाश ह्या अंधाऱ्या कोठडीत;
काय बाता करतोस उगाचची, फुशारकी नुसती,
बोले वसवी ईश्वराचे राज्य भूतलावर;
खिळ्यांनीं ठोकलेला जर देह तुझा भिंतीवर
असे खात्रीची श्रध्दा सोडव आता तूचि तुला;
ये जन्मात घेण्या आम्लद्रव कापसाच्या बोळ्याने,
कर शोषण दुर्घटनांचे, नियतीचे, प्राक्तनाचे;
भरलेला आहे लोखंडी पेला विषारी काळाने,
क्रूर द्वेषच इथे, माहित नसे थेंबभरही प्रेम.
8 May 2025
Savitri Book 2 Canto 7 – The Descent into Night
A Power that laughed at the mischief of the world,
An irony that joined the world’s contraries
And flung them into each other’s arms to strive,
Put a sardonic rictus on God’s face. ||56.17||
Featured image: Painting by Huta
Sketch by the Mother


Leave a reply to Heather Congrove Cancel reply