Ujwal will be born
जन्मास येई उज्वल
जतन केलेले आहे मी हृदयात शुभ्र पूज्य
हसऱ्या चेहऱ्याचे, सुगंधी कल्पनेचे, सौम्य;
छानशा प्रसन्न अंगणातील बारीक पावसाने
फुलवली वाटिका गुलाबी प्रेमाच्या हर्षात;
आला अग्निपुत्र नेसून भरजरी पितांबर,
घेऊनि हातात तांबूस तपकिरी टाळ;
ऐकू येती निरवतेतून उद्भवणारे ध्वनी,
उंच मंत्रघोषात झरझर होती गोळा शब्द;
दृष्टीने मारली उडी विचारांच्याही पलीकडे
आणि गवसला अर्थ पुरातन गूढ रहस्याचा;
शुभ्र पूज्यात साठवलेले अनंताचे भांडार,
की जन्मास येई उज्वल, चैतन्यशील बालक.
4 May 2025


Leave a reply to Gauri Mahesh Karandikar Cancel reply