A message brought by my bird
आणे संदेश पक्षी माझा
आणे संदेश पक्षी माझा, — फाटले आभाळ,
कोसळती हिरे माणिकांच्या सरीच्या सरी;
सृष्टीच्या छोट्या संसारात बरसात प्रेमाची,
की क्षणाक्षणांमधेही उजळे शाश्वत;
हत्ती घोडे धावती गोळा करण्याकरिता
अद्भुत वैभव, न्यारी विपुलता प्राणा-देहात;
बदले येत्या युगात प्रकृतिधर्म प्राचीन
महाभूते अंग अंग होतील परा ईश्वरीचे;
मागे घडली जाज्वल्य धारणा योगियाची,
जडत्वात आत्मचैतन्याची कार्यशीलता.
२९ एप्रिल २०२५

The featured photo is of Bulbul sitting on a wire in the front courtyard

Leave a comment