Satyavan — the Soul of the Earth
सत्यवान — पृथ्वीचा आत्मा
स्वीकारूनि पकड विकृत मृत्युचि
काळाच्याहि पुढे पाऊले जाती त्याची ।
बंधने घेतली प्राज्ञ हेतू पुरस्कारून
महाद्वार उघडे मोठा विजय मिळवून ।
अगाध संहिता केली होती आत्मसात,
अध्यात्म प्रज्वलित होऊनि जड देहात ।
आराधना नव्हे केवळ आत्मोन्नतीची
क्रियाशीलता जीवनातहि दिव्यत्वाची ।
अभ्यासले प्रकृतीचे गुणधर्म, तिची धारणा,
आहे तेथे देखील उद्याची प्रगल्भ प्रेरणा ।
धावे त्याच्याच मागे मधुमन्त सरिता
किलबिलाट सांगे, ही आली प्रफुल्लता ।
नाद असे भविष्याच्या संगीताचा
सर्वां ठायी दरवळे सुगंध चंदनाचा ।
3 April 2025
The featured image is a part of a painting by Huta
Savitri, The Book of Love

Leave a reply to supriyafdce46d60a8ae Cancel reply