झोप होती माझी लांबलचक
झोप होती माझी लांबलचक
घडवीत न संपणारे स्वप्न एक ।
गंभीर सूचक होते दाहीहि क्षण
दशदिशांचे ध्वनि एकवटवून ।
ऐकू येत होते अपेक्षेचे सुरेल नाद
शब्दांचा अर्थ साधित शुभ संवाद ।
प्रसन्न खोल तळ्यात झळकत होती
पवित्र कमळे सांगत त्यांची कीर्ती ।
नसण्यापासून आले हे सर्व असणे
चमत्कार सुप्ततेत हो, तिचेच करणे ।
पलिकडे वसलेली होती नगरी
अमरत्वाची ठेवी उभी, उत्फुल्ल, खरी ।
काळाने कमावले आपले ध्येय
त्या झोपेच्या परिपूर्णत्वाचे श्रेय ।
22 March 2025
A Painting by Claude Monet


Leave a comment