It has to be here

It has to be here

By

/

1–2 minutes

read

It has to be here

हवे ते इथलेच

जे सांगायचे होते ते सांगून झाले, 

पण होते ते अंतरावरील, पलीकडले ।

हवे ते इथलेच, हिरव्या रानांचे,

गुराढोरांचे, वाहत्या नदीनाल्यांचे ।

मुक्ति असावी रामरगाड्यापासून 

जन्म-मृत्युचे जड बंधने तोडून ।

पाहिजेत साखळ्या निखळलेल्या, 

अज्ञानाच्या सीमा ओलांडलेल्या ।

तर खरी होई जीवनाची सुरुवात 

अग्नि घेई सर्व त्याच्याच हातात ।

हवे ते इथलेच, आनंदाने दाटलेले,

बुधवारच्या बाजारात गजबजलेले ।

स्वीकारायचे आहे गूढ भूमीमधील

शोधण्याशी मूल्ये दगडामातीतील ।

5 March 2025

One response to “It has to be here”

  1. Soham Karandikar Avatar
    Soham Karandikar

    “Budhwarcha bazaar” is an interesting way to represent the omnipresent nature of the divine

    Liked by 2 people

Leave a comment