The Deep Purple Dawn

The Deep Purple Dawn

Category:

By

/

1–2 minutes

read

जांभळा रंग गहिरा

जांभळा रंग गहिरा, जांभळी पहाट,

गोड हसे उत्कंठा बघत आशेची वाट ।

उमले मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या अंतर्देही 

सुगंध भावनांचा कल्पकतेच्या ठायी ।

प्रभात उगवे उदात्त भविष्याची 

काय ठरविले होते पूर्वी घडे तेची ।

नियतीने घेतली झेप अचानक मोठी

जुने प्राचीन गुणधर्म बदलण्यासाठी ।

रात्रीचा न होई स्पर्श चंद्र-तारकांना,

क्रियाकृतीत खोटारेपणा येईचना ।

ती बंधने, गळुनी पडे मनाच्या शृंखला,

मुक्तता नव्हे मोकळीक कर्तृत्वाला ।

सूर्य उतरे समईच्या अखंड वातीत  

अस्तित्वाचे वास्तव्य घरा-घरात ।

28 February 2025

उमले मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या

One response to “The Deep Purple Dawn”

  1. Soham Karandikar Avatar
    Soham Karandikar

    “सूर्य उतरे समईच्या अखंड वातीत अस्तित्वाचे वास्तव्य घरा-घरात” is beautiful

    Liked by 1 person

Leave a reply to Soham Karandikar Cancel reply