Comes the auspicious bodied — येई शुभांगी

Comes the auspicious bodied — येई शुभांगी

By

/

1–2 minutes

read

येई शुभांगी

इथे तिथे जाई जुई मोगऱ्याचा उल्हास 

कोण म्हणे हा तर भ्रम, हा तर आभास?

खळखळा वाहे स्वरास्वरांचा आनंद 

अद्भूत महाकाव्याचा आल्हादिक नाद |

नसे खोटेपण, अस्तित्व हे केवळ सत्याचे,

माळरान दरीडोंगर सर्वत्र वास्तव्याचे |

अणुरेणूत तीच प्रतिष्ठा, तोच थोरलेपणा,

प्रफुल्लित जशी असे ही हसतमुख प्रेरणा |

​सप्तगंगेच्या काठी बसली महापंगत 

आवडीचेच पक्वान्न, सुगंधी केशरभात |

दीप्तिवन्त वरुण इंद्र अग्नि सवितृ भग मित्र 

प्रसन्नतेचा ध्वनी घुमे नवगायत्रीचा सर्वत्र |

उधळीत गुलाल येई शुभांगी मंगलदायिनी 

अमरत्व​ श्रेष्ठतेचे वाढवित ह्या मृत्युस्थानी  |

१३ फेब्रुवारि २०२५

The featured image is a painting by Huta, Savitri Book One Canto Two.

One response to “Comes the auspicious bodied — येई शुभांगी”

  1. Rajan Jawle Avatar
    Rajan Jawle

    अप्रतिम

    Liked by 1 person

Leave a comment