हिरण्यसेतू आहे ती
हिरण्यसेतू आहे ती, अद्भुत अग्नि,
उसळे अर्णव तिच्या देहकांतीने;
तो काळप्राणी भयंकर बदलेल,
दुष्ट नियती देखील तिच्याचमुळे;
रहस्य तिचे लपवी काळोखी रात्र,
परंतु आत्मकिमयेचा चमत्कार;
साफल्यता ह्या अनिश्चित जीवनाची
होईल परिपूर्ण आशीर्वचनाने;
तेजःसूर्य ती तर करी प्रज्वलित
सूर्यच सूर्य, असंख्य सूर्य आपले;
सुवास्तव्य माधुर्याचे घराघरात,
नांदे आल्हाद प्रासादिक समृद्धीचा.
२१ फेब्रुवारी २०२६



Leave a comment