अस्मानी रंगाची स्फूर्ती
हो, काय झाले एकदा आली अस्मानी रंगाची स्फूर्ती,
डोळ्यात होते तिच्या सृष्टीच्या पलीकडचे पाहण्याचे;
धावत धावत आला थोरला डोंगर कल्पनेच्या वेगाने
व सौंदर्याची ख्यालीखुशाली सांगू लागले हर्षीत ओढे;
मोरपिसाऱ्यांचा थयथयाट, भावनांचे आल्हादी गीतगान,
दूरचित्रवाणी आणू लागली प्रफुल्लित आशांचे हारतुरे;
पहा की, चपळाईने येई प्रकाश अंधाराच्या गुहेतूनी,
ही अगाध करणी घडविण्याकरिता तर प्रपंच सारा;
दाट गढद छायेतून येईल आवेशी न विझणारी ज्योत,
ह्या राखेत होईल जागी धगधगणारी सोनेरी ज्वाला;
नका सांगू मागचे, जुने पुराणे, की देह भस्मच शेवटी,
अग्नीतर घडवी चैतन्यतनु जिंकूनी कठोर मृत्यूलाही;
येत आहे जवळ अनंताचा पळ राहण्या इथे सदैव,
घेई जन्म जेंव्हा अनादी दिव्यशक्ति पृथ्वीच्या गर्भी.
७ नोव्हेंबर २०२५

A rendering into English is being done.
Here it is:

Leave a comment