स्मिताचा आनंद मधुर चंद्रमातून
ओतला आहे मधुर चंद्रमातून स्मिताचा आनंद
कीर्ती वाढविण्या आल्हादी भविष्याचे जीवन;
गूढ उद्देशाने थोरले आभाळ झालेही विशाल,
नवीन चमत्कारांची उत्कृष्टता असावी म्हणून;
मार्ग जरी जाई महारात्रीच्या भयानकतेतून
ती तर बाळगे रहस्याची न संपणारी समृद्धी;
काळेकभिन्न स्वप्न जे धारी श्रीमंती शून्यता
आणे प्रत्ययास असलेली दिव्य आकांक्षा;
जावे कुठेपण दिसती देहरूपे त्या चैतन्याची,
प्रभाव बोलू लागला खडकाळ डोंगर देखील;
सौंदर्याचा कसबी शिल्पकार करी मूर्तिमंत
आविष्कराच्या प्रेरणेत अनिर्वचनियेलाही.
२५ ऑक्टोबर २०२५

Beauty under the Full Moon
A rendering into English by Akash Deshpande:
From the sweet moon is poured happiness of a smile
To increase the glory, life of joyous future
With secret purpose the ancient sky became vast
That there may be excellence of new miracles
Though the path wends through the terror of the great night
That fosters the unending wealth of mystery
The deep dark dream that bears prosperous Nothingness
Presents the existing divine aspiration
Seen everywhere the body-forms of consciousness
Even the rocky hill attests to this effect
Beauty’s skilled sculptor incarnates the enigma
Verily in discovery’s inspiration
In 12 syllables per line

Leave a comment