धन्यत्वाची महान प्रचिती
Freedom is to flourish in the Spirit’s Possibilities
समर्पिलें देवाला सर्व, दैवाधीन न होता,
क्रियाशील आत्मा उभारे समृद्धीचा संसार;
नाही देव देवघरातच, घर सांभाळण्या,
वाढे त्याची कीर्ती अणुरेणूत, विश्वाविश्वात;
उद्धार नव्हे मुक्ती नव्हे, चैतन्याचा प्रभाव,
आशा अपेक्षा करीत तेजःपूंज ज्वालाप्रति;
अचंबा असा, फुटले बोल माती धोंड्यांनाही,
नाचत हासत बहरली बाग अंगणात;
धावे धावे सरिता सांगण्या हर्ष अर्णवाला,
म्हणत मी जाई परत उगमाकडे उद्याच्या;
शब्दात अर्थाची अलौकिक बहुविविधता,
दृष्टांतांचा विस्मयकारी आविष्कार सगळा;
आले पलीकडच्या नभातून थवेच्याथवे,
शेंदुरी नारिंगी चंदेरी सोनेरी आनंदाचे;
ऐकू येत आहेत स्तब्धतेचे सूर अंतरी,
तालांची चढउतार, संगीत सुमाधुर्याचे;
उधळीत गुलाल नाद जयजयकाराचा,
येई धन्यत्वाची महान प्रचिती क्षणोक्षणी.
५ सप्टेंबर २०२५
AI Created Image


Leave a comment