My Two Eyes

My Two Eyes

By

/

1–2 minutes

read

My Two Eyes

माझे दोन डोळे

माझा उजवा डोळा पाहतो उंच आकाशाकडे,

धुंडूशोधीत त्याचे न दिसणारे गूढ निळेपण;





असेल त्याच्याही पलीकडे खूप वास्तव्य प्रज्ञेचे

तरीही न जाई दृष्टी जसे शून्य ते, अगाधच;





म्हणे, हो, तेथून झाला प्रारंभ ह्या घडामोडींना,

वाहू लागली न थांबणारी ध्येयनिष्ठ सरिता;





हिरवीगार शेतीवाडी पशुपक्षी, विचारवंतही,

घेतील भरारी भविष्याची, गाठण्या सर्वोच्चता;





दुसरा मारे खोल उडी निसर्गाच्या अंधाऱ्या रात्रीत,

कालगतीत दिसे तिथे अनादीकाळाची क्षमता;





चमत्कार असा की नाहींतून उपजे ईश्वरत्व,

जसे काही ऐकू येई शंखनिनाद शंखाविना;





प्रदीप्त आहे हिरा दाखविण्या मूल्य काळोखाचे,

कण तेजस्वितेचा वाढे वाढे त्याच्या रहस्यात;





गम्य आंतरात पाहिले अवलोकनाऱ्या दृष्टीने,

आणि आली जन्मास आश्चर्याची परिपूर्णता;





नजर भेटे नजरेस शोधता अज्ञानाचे ज्ञान,

मिळती प्रतिसमांतर रेषा अलौकिक बिंदूत.

१६ ऑगस्ट २०२५

The Mother’s Two Eyes

Leave a comment