Sight meets Sight — Marathi

Sight meets Sight — Marathi

By

/

1–2 minutes

read

टक भिडे टकेला

मिळविले सुरेख पंख सुरंगीत स्वप्नाने,

हर्षाची ही झेप दाट हिरव्या डहाळीवर;





शब्दार्थांची उडी सर्जनशील शांततेत

ह्रदयाचे स्पंदन आश्चर्याच्या वेगाने;





वाजे भलामोठा गॉंग डोंगरमाथ्यावर

आणि झाला वैभवी सौंदर्याचा जन्म;





मंत्रप्रेरणेने होई गूढ अगाध शोध सुरु,

दैवयोगाचा, नियतीच्याही पलीकडचा;





विधिलिखित, आत्म्याचा, थोर कुलीन

येई रोजच्यापेक्षाही निराळ्याच वाटेने;





अंतर्ज्ञानी क्षणाच्या स्मिताचे ते सामर्थ्य

पुष्कराज धावे पुष्कराजाच्या जीवनात;





दृष्टीने पकडली दृष्टी, अग्नीचे आलिंगन,

जिंकले मृत्यूचे सगळे प्रांत प्रबळ प्रेमानेच. 

७ ऑगस्ट २०२५

This is based on the original in English which is here:

वाजे भलामोठा गॉंग डोंगरमाथ्यावर

Gong – Thai drum metal traditional musical instrument. It is formally used in majestic and religious ceremonies. Street music day.

Leave a comment