Rose of God

Rose of God

By

/

1–2 minutes

read

Rose of God

हे ईश्वराच्या गुलाबा

श्री अरविंदांच्या एका इंग्रजी कवितेचे उदाहरण येथे पाहणे योग्य ठरेल. तिचे शीर्षक आहे Rose of God, ईश्वराचा गुलाब, पाच कडव्यात. त्याचे शेवटचे कडवे असे :





Rose of God, like a blush of rapture on Eternity’s face,

Rose of Love, ruby depth of all being, fire-passion of Grace!

Arise from the heart of the yearning that sobs in Nature’s abyss:

Make earth the home of the Wonderful and life beatitude’s kiss.





हे ईश्वराच्या गुलाबा, तू अनंतकाळाच्या चेहऱ्यावर लालीसारखा हर्षच,

हे प्रेमाच्या गुलाबा, माणिक-खोली सर्व अस्तित्वाची, कृपेची अग्नि-उत्कटता!

उठ, तळमळीच्या ह्रदयातून उठ, देत आहे जी हुंदके निसर्गाच्या विवरात,

होऊ दे, कर, पृथ्वीला अद्भुताचे निलय, दे जीवनाला परमानंदाचे चुंबन.





गूढ आणि गहन कवितेत विशिष्ट प्रकारच्या दार्शनिक आणि आंतरीक भावना असतात, केवळ कल्पनाशक्ती किंवा विचार नसून गोष्टी सूचकपणाने प्रतिकात्मक भाषेत सांगितल्या जातात. त्यातून निरनिराळे पैलू निरनिराळ्या अर्थछटा उद्भवून उजळतात. अनाकलनीय विषय हाताळून ती एका अद्वितीय प्रकारच्या प्रत्यय अथवा अनुभूती संवेदना घेऊन येते. त्यात तिचे यश आहे.

Leave a comment