Light dwelling in the body of Death
मृत्यूच्या देहात वसे प्रकाश
अंतरजीवनाच्या गाभाऱ्यात आहे तो,
फुंकर मारली आणि तेजाळला अग्नी;
सूर सापडला गाण्याचा, होकार ग्रहांचाही,
केवळ आत्मप्रेरणेतूनच उगवले धनधान्य;
धडधडे सुगन्धित पाऊस टेकडया दऱ्यात,
मयूरपंखी उत्स्फूर्त हास्य नाचे गावोगावी;
ओढ साकारण्याची अगदी जन्मापासून,
गुणवंत सागर पिण्यास धावे ही सरिता;
न करे उंच काळी भिंत काही दृष्टीआड,
आहे खऱ्या-सत्याचे अस्तित्व चोहीकडे;
पहा, आनंदोश्वास घेणारी जांभळी बीजे,
बोलके शब्द पहिल्या निश्चयी संकल्पाचे;
प्राचीनतम इच्छा होई जागी चार वाजता,
मृत्यूच्या देहात वसे सर्व यशस्वी प्रकाश.
९ जुलै २०२५

Leave a comment