Cave of Night with a Lamp

Cave of Night with a Lamp

By

/

1–2 minutes

read

Cave of Night with a Lamp

अंधाराच्या गुहेत तेवत आहे दिवा

अंधाराच्या गुहेत तेवत आहे दिवा

दाखविण्या स्वप्नाची महत् उत्सुकता

की चमत्कारीक किमया चैतन्याचीच

अनावस्थेतही लपलेले सत्याचे गूढ;

शून्य घडविले येण्या अजोड सृष्टी

इथे तिथे पाहता दिसे दृष्टीस रूप

घेतलेले रहस्यमय निराकाराने;

सकाळी चार वाजता पडली बाहेर

धडाडीची आकांक्षा जागृत उल्हासात,

आटोपूनी नित्याचे आन्हिक विधी

अनुभवन्यास झाली प्रेरणा पावन;

जसे अचानक सापडावा प्रौढ मोती

गढूळ पाण्यात, झिडकारुनी बंधने

कीर्ती चढे उंच अतिकाय डोंगर;

निशाचरही झाले दिव्यत्वाचे अंश

जीवन वाढविण्या पृथ्वीतलावर;

अंधाराची खोली शोधता शोधता

जाणवे तळपणारा सूर्यच सर्वत्र.

२३ जून २०२५

Leave a comment