Look, this garden of wonders!

Look, this garden of wonders!

By

/

1–2 minutes

read

पहा, फुलबाग पक्षी आनंदाचे झरे

दुष्टांनी काढला पळ मागच्या दाराने,

न येतील ते परत जीवनाच्या ओसरीत;

संपले सारे, राग द्वेष मत्सर मद मोह,

प्रेमभावना हीच तर ह्रदयात हास्य गोड;

निर्मिली ना अंधारी रात्र करणास्तवच,

जाणून पाहिजे ज्ञान तिच्या जवळचे;

नवभविष्याची ज्योत पाजळे अंतरी,

उल्हसित कल्पनांचे बहारदार उद्यान;

पहा, फुलबाग पक्षी आनंदाचे झरे,

नृत्य सर्जनशील जोमाचे होई आता;

येई गुलाबी झुळूक उद्याच्या पहाटेची,

अवतरे क्षणाक्षणात समृद्धीचे चिरत्व;

अहो, विचार करा उत्तुंग उभारला डोंगर

वाढविण्या अगाध सौंदर्याची प्रसन्नता;

भूवरी उतरे शिखर त्याच्याही पलीकडचे

उच्चतमाची वैशिष्टे जोपासण्या इथे.

१३ जून २०२५

Images are of Matrimandir Gardens Auroville

Leave a comment