The Leaves of Palāsh Tree — 2

The Leaves of Palāsh Tree — 2

By

/

1–2 minutes

read

The Leaves of Palāsh Tree — 2

पळसाची पाने — २

११: पावित्र्य 

आलेली ही सकाळ नाही कधीच जाणार,

परवाचे फूल मोगऱ्याचे, बघा आज ही ताजे,

— त्याचे कारण शुभ्र सुगंधी पावित्र्य हेची.

१२: सांगशिल का?

सांगशिल का, काय मोठा उद्देश की,

माधुर्य प्रेमाचे आहे जास्त गोड गाण्याहून, 

— निळेपण उंच उंच आकाशाहीपेक्षा?

१३: एक कठीण जिज्ञासा 

थांग न लागणाऱ्या अजब पोकळीत 

खोल उतरे ज्ञानसूर्य, उत्सुकता की, 

— असू शकेल का  शून्यतेत रहस्य काही.

१४: निवडुंगाची फुले  

​वाळवंट, ही निवडुंगाची फुले तिथे,

आणि त्यांना उमगलेले आहे रहस्य, 

— अनोखा आनंद, ते हास्य, रेताळातही. 

१५: सतत पडत राहिला पाऊस

चंद्रकोरीने शिंगावर धरला डोंगर,

कौतुकचकी, नवल, अद्भुततेचे कृत्य,

— आणि सतत पडत राहिला पाऊस.  

१६: वेगवान प्रगती

वेळ आणि कारणस्थिती

गायब होतात निर्वाणाच्या देहात,

— आणि येई गती कांस्य चक्राला.

१७: देशपांड्यांचा वाडा 

वाड्याच्या छानश्या अंगणात आंब्याचे झाड,

डेरेदार, पूर्वजांनी लावलेले, प्रेमळ, घराण्याचे,

— येतो इथे मोहक भरदार मोहोर कल्पनांचा. 

१८: आरोहण 

कीर्तिशाली चढण, उंच उंच चढणारी,

हिमालयाहूनही उंच, विश्वामित्राची तपश्चर्या,

— गायत्रीचा घोष, अवतरे सविताच. 

१९: ध्वनी विचारे 

दुरून येत आहे ध्वनी छोट्याशा धबधब्याचा,

जाई तो न दिसणाऱ्या सागराकडे,

— विचारे, धबधब्याला परतेलका मी?

२०: चांदीचा चमचा 

चांदीचा चमचा पण कुठे आहे बाळ?

हासत डोलत सांगे आश्विनाची चंद्रकोर:

— गर्भात वाढे वाढे अग्निपुत्रच.

18 May 2025

निवडुंगाची फुले  Cactus Flowers

Leave a comment