This love only with a single objective

This love only with a single objective

By

/

1–2 minutes

read

This love only with a single objective

ह्या प्रेमभरणीत एकच ध्यास 

​आश्चर्य की! घडत आहे हे युगायुगानंतर,

एक अतुलनीय क्षण, ​अद्भुत अलौकिक क्षण,

हा असा, स्थिर, शांत ​भरीव, आहे उभा,

 गतिमान ​शाश्वत अद्भुतते​ने पाहत आहे;

भाग्यशाली काळाच्या अधिष्ठात्याने झेललेला,

​दिव्य ​देहाची योजना करण्यासाठी तो क्षण,

अलगद आनंदाने घट्ट धरलेली सुसंधी;

एका ​आवेशी अविश्वसनीय महासागराने

ओतले आहे स्वतःला एका​ महासागरात, ​

माधुर्य माधुर्यामध्ये ​पूर्ण समरस झा​ले​ले,

सोनेरी ​मधात सोनेरी मध, दिवसात दिवस;

एक​रूप होऊन  अथांग ते  परिपूर्ण जीवन

करीत आहे लुसलुशीत शेता​ला ​ उल्हसित;

प्रियेचे ​सुंदर रेखीव​ ​आंतरिक आकर्षण

आणले आहे प्रेम-प्रितीने​ निदर्शनास, बाहेरही,

दृष्टीला टाकले दाखवून, केले आहे प्रसन्न; 

आणि खुलवूनि सौंदर्याच्या  आनंदी जादू​ने 

केले ​तिने​ मोहित प्रियकराच्या नश्वर आत्म्याला;

आकाशभर ​ थोरला गोडवा आणला प्रियतमेने 

आणि टाकल्या काढून त्याच्या ​पुरातन जखमा;

के​ले नष्ट द्वैत आत्मा आणि जड पदार्थातील,

कालातीत, कठोर, श्रेष्ठतेच्या आड येणारे,

गेला भौतिक आणि आत्मिकतेतील विरोध; 

करीत आहे चेहेऱ्यावर नृत्य उल्हसित थोरवी

सौंदर्य आणि आकर्षण यांची, भरगच्च  आनंदी;

पण होता एकच मोठा ​ध्यास ह्या प्रेमभरणीत​,

आणि ​तो ​ध्यास, असण्या​चा एक ​रूपांतरीत ​देह,

दिव्य क्रियाशील देह चमत्कारिक मृत्युलोकीही;

असेल​ असा देह ​जशी काही अभिनव वीणा,

अनं​ताचे संगीत ​प्रदान करणारी, अनंत​ताची,

आत्म्याच्या ​बहुविध महानतेम​धे प्रकटणारी;

असेल सोनेरी-नारंगी ज्वलंत अग्नीचे ​पात्र,

​ चैतन्यमय भांडे, त्याची तनु, श्वास घेणा​​री​;

​उमललेली आहेत बागेत ​सर्वत्र नवीन फुले 

आनंदी, आणि​ करीत आहेत गोळा म​धमाश्या

नवीनतम मध, ​सर्वत्र नवीन नवीन आविष्कार;

​ स्वीकारुनी​ देहा​चा चैतन्यशील ​पदभार,

उजळीत आहे पुष्कराज अग्नी जीवनाचे वैभव,

येईल तो घेऊन  मृत्यूहीन ​अमृतमय देह, 

आणि होईल प्रत्यक्षात पृथ्वीवर ज्ञान​​पुरुष​.

​१४ मे २०२५

14 May 2025

The featured image is a painting by Huta, Savitri The Book of Love Book Five Canto Three

Love’s Alchemy

One response to “This love only with a single objective”

  1. RY Deshpande Avatar
    RY Deshpande

    On the high glowing cupola of the day

    Fate tied a knot with morning’s halo threads

    While by the ministry of an auspice-hour

    Heart-bound before the sun, their marriage fire,

    The wedding of the eternal Lord and Spouse

    Took place again on earth in human forms:

    In a new act of the drama of the world

    The united Two began a greater age. ||104.19||

    Savitri V:3

    दिवसाच्या उंच तेजस्वी घुमटावर
    नशिबाने सकाळच्या प्रभामंडलाच्या धाग्यांनी गाठ बांधली
    तर शुभ-काळाच्या सेवेद्वारे
    सूर्यासमोर हृदयस्पर्शी, त्यांचे लग्न अग्नि,
    शाश्वत प्रभु आणि जोडीदाराचे लग्न
    मानवी स्वरूपात पृथ्वीवर पुन्हा घडले:
    जगाच्या नाटकाच्या एका नवीन कृतीत
    एकत्रित दोघांनी एका मोठ्या युगाची सुरुवात केली. ||१०४.१९||

    Like

Leave a comment