Celebration of the Wonderful

Celebration of the Wonderful

By

/

1–2 minutes

read

Celebration of the Wonderful

 अद्भुताचा उत्सव

अद्भुताचा उत्सव, अनिर्वचनियत्वाचे सौंदर्य,

चैतन्याचे धन, सत्याचे धन, आनंदाचे धन,

विराटाचे हिरण्यगर्भाचे प्रज्ञानघनाचे वैभव,

सप्तलोकाची क्षमता, सप्तभूमीचे गूढत्व,

सप्ताग्निची प्रज्वलता, सात आहुतींचे मूल्य,

सात अर्चनांची भावपूर्णता, अर्घ्यांचे प्राशण, 

सात रंगांचे, स्वरांचे, सप्ततारकाची दृष्टी,

सप्तशृंगाचे उंचावणे, मार्कंडेयाचे मनन,

सप्तदेवाची तेजोमयता, सप्त मानवाचे कर्तृत्व,

प्रशांततेत मधुर वीणेचा सर्वंकष रस,

सप्त पाताळातही आगळेवेगळे आश्चर्य,

 जीवनात मरण्यात वाढणारी मोठी समृद्धी, —

ठरवी हे सर्व ईश्वराचा महान संकल्प

आणि यशस्वी करीन ईश्वरीच कार्यसिद्धी,

निश्चित, तोचि तर सौंदर्याचा अद्भुत उत्सव. 

13 May 2025

Leave a comment