Rings a thousand kilo bell
प्रशांतीची लयबद्ध रूपे
हजार किलोची घंटा वाजे संथ तालात,
उंच शिखरावर, दृष्टीच्या खूप पलीकडे;
होकारार्थी ध्वनी येई त्याच्याही पलीकडून,
विवेकी, मौल्याचा, सन्देश दूरच्या भविष्याचा;
प्रतिसाद मिळे हर्षित दऱ्याखोऱ्यातुन,
हसती तृणबिंदू, विस्मयीत होती वनपाखरे;
शोधता शोधता शोधले गोड तुहीनाचे रहस्य,
नीळ गगनी न हतमळलेल्या उदात्त आशांचे;
ह्र्दयाच्या अथांग गुहेतून येती मंजुळ सूर
प्रशांतीने धारण केलेली लयबद्ध रूपे;
नाचे आनंदाचा मयूर हिरव्या अंगणात,
सुरेख त्याचा पिसारा विश्वाचा पसारा की.
9 May 2025

Leave a comment