Glorious objectives of consciousness
चैतन्याची तेजोमय उद्दिष्टे
देहप्रकृतीत आहे बसलेला प्राचीन मृत्यु,
पण ही तर नीव्वळ जुनी एक आखणी;
मी मरत आलेलो आहे अनेकदा, जन्मोजन्मी,
म्हणूनीच का मी मरणार आताही पुन्हा?
पूजेचे फूल संध्याकाळी होईल निर्माल्य
साधले का त्याने त्याचे खरे मौलिकत्व?
दैवदुर्विलास ह्या संसाराचा चमत्कारिक
देहान्तात पेरलेली आहेत बीजे उद्याची;
काया नसे इथे केवळ भस्म होण्याकरिता
हाच मृत्यु घडवे उत्कर्षित रूपे रूपे;
पण ती आहेत अज्ञानात जखडलेली,
नसाव्या त्या आणखी दुःखमय शृंखला;
निष्क्रिय ठरे कालचे क्रियापद निश्चित
मुक्त होईल तनु काळ्या जड अज्ञानातून;
हेच नव्हे, हिरण्यमय अग्नि घेई देह
साधण्या तेजोमय उद्दिष्टे चैतन्याची.
2 May 2025
Context:

Leave a comment