Highway of the Future
भविष्याचा महामार्ग
दूरच असोत तत्वयोजक, इतिहासकार,
भविष्याचा महामार्ग तर बांधे भविष्यच;
नारंगी पहाटेतूनी फटफटे आशाशील प्रकाश
आणि जाती चरायला गायी गावरानावर;
मधट पावसाने भिजलेले हिरवेगार गवत
देई त्यांच्या त्वचेस अलौकिक उज्वलता;
श्रेष्ठ, म्हणुनी त्या आहेत मही, गोमती,
प्रख्यात, महान सत्याच्या आविष्कारार्थ;
हाचि ख्यातनाम यज्ञ ठरवे वाटचाल,
हेचि समर्पण चैतन्यशक्तीला संपूर्ण;
नियतीचा क्षण आहे मोठ्या संकल्पात,
येई त्याच्यातुनीच न ढळणारा दिवस.
28 April 2025


Leave a comment