The future of the Witch
चेटकिणीचे भवितव्य
पहा बसलेला ह्या फांदीवर सुंदर पक्षी,
दैदिप्यमान, लालसर पट्टा गळ्याखाली;
आत्मविश्वास असे त्याचा इथे येण्यात,
महत्प्रेरणेने स्फुरित दिव्यत्व साधण्या;
सांगे एक मौज काय विचित्र घडले एकदा,
भेटली होती रात्री काळी विद्रुप चेटकीण;
म्हणे, जाण हे पक्के, अधिक मास संपता
मृत्यु तुझा अटळ आला जरी तू तेथून;
निर्णय माझा नव्हे, काळाचीच नक्की यंत्रणा,
नसे सुटका दैवगतीतून भल्याभल्यांचीही;
पण होतो मी निर्धास्त, आंतरिक निश्चितेत,
घेत सोनचाफ्याच्या डहाळीवर हिंदोळे;
अग्निकुंडांतुनी उगवला होता हा अमर वृक्ष,
शुभत्वाने वाढविलेला, स्पर्श न होई कशाचा;
अद्भुत अस्मानी तेज माझे, न छेदती शस्त्रे,
मज न जाळे पावक, देहही असे प्रज्वलीत;
नसे तिच्याजवळ प्रतिभा, संज्ञा संपदा,
त्रिकालदृष्टीच्या पलीकडचे पाहण्याची;
मग कसा ठरे तिचा शब्द खरा, अज्ञानी ती?
मी मुक्तच नव्हे, चैतन्यात असे क्रियाशील;
लहान कक्षेत न बांधलेला, श्रेष्ठ मी, महान,
दिव्यत्वाचा गूढ अंश दिव्यत्व वाढविण्यास;
एके दिवशी काळी चेटकीणही होईल सोनेरी
सोन्याची फुले वेचण्या सोनचाफ्याखाली.
२३ एप्रिल २०२५
The featured photo is of bulbul sitting on a wire in the garden, a song bird

Sonchafa Golden Champa Magnolia Champaka




Leave a comment