Pahādgunj

Pahādgunj

By

/

1–2 minutes

read

Pahādgunj

पहाडगंज

इथे विकत मिळती साखरेच्या गोण्या,

भरलेल्या दगडामातीच्या गोडव्यानेही;  

एके दिवशी काय झाले भर दुपारी 

भगवंतानेच घेतली गोणी ​पैसे देऊन;

गेला घेऊनि स्वगृही प्रियेस अशी भेट,

सांगे, अगे, चमत्कार हा बघ पृथ्वीचा;

आविष्काराचा मी दिला होता सूर्य

आणि झाला चिन्मय पार्थिव देहही;

अमृतपाण्याने वाढवलेली ही साखर 

मिळे ह्याच विस्मयकारी मृत्युलोकी. 

२० एप्रिल २०२५

Featured image: Wholesale sugar shop

Pahādgunj Market

Leave a comment